नाशिकच्या चांदवडमध्ये गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर

नाशिकच्या चांदवडमध्ये गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर

| Updated on: Nov 29, 2023 | 1:25 PM

अवकाळीनं बागेतील द्राक्षाचे घड आणि पाने जमिनीवर तुटून पडले आहेत. द्राक्षबागांची घडावर पकड सुद्धा राहिली नाही. द्राक्ष तयार होणार नाहीत अन् व्यापारी द्राक्ष खरेदी करण्यासाठी इकडे येणार पण नाही त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या द्राक्षबागेचे आता करायचे काय? असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय.

नाशिक, २९ नोव्हेंबर २०२३ : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील बहादुरी गावातील द्राक्षबागा संपूर्ण नेस्तनाबूत झाल्याचे पाहायला मिळत आहे. बागेतील द्राक्षाचे घड आणि पाने जमिनीवर तुटून पडले आहेत. द्राक्षबागांची घडावर पकड सुद्धा राहिली नाही. द्राक्ष तयार होणार नाहीत अन् व्यापारी द्राक्ष खरेदी करण्यासाठी इकडे येणार पण नाही त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या द्राक्षबागेचे आता करायचे काय? असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय. तर लाखो रुपये पदरचे खर्च करून, शेतात राब-राब कष्ट करून द्राक्ष बाग उभी केली जाते. या द्राक्ष बागेच्या येणाऱ्या उत्पन्नावर सुखी संसाराचे स्वप्न रंगवले जातात अन् क्षणार्धात निसर्ग सारं काही हिरावून नेतो असेच काहीसे राज्यात पाहायला मिळत आहे. गारपिटीमुळे संपूर्ण द्राक्षबाग उध्वस्त झाल्याने बळीराजाने पाहिलेल्या स्वप्नावर पाणी फिरलं आहे.

Published on: Nov 29, 2023 01:25 PM