गौतमी पाटील अन् माधुरी पवार यांचं मनोमिलन, मनोरंजन क्षेत्रातील कट्टर कलाकार आले एकत्र; पाटील-पवारमधला वाद संपणार?
VIDEO | डान्सर गौतमी पाटील आणि अभिनेत्री माधुरी पवार यांच्यातील वादावर अखेर पडला पडदा, पुण्यातील एका कार्यक्रमात एकमेकांच्या हातावर बांधलं फ्रेंडशिप बॅन्ड अन् भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या साक्षीने दोघींची पुन्हा मैत्री
पुणे, ११ ऑगस्ट २०२३ | एकमेकींवर टीका करणाऱ्या डान्सर गौतमी पाटील आणि अभिनेत्री माधुरी पवार पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात एकत्र आल्यात. विशेष म्हणजे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या साक्षीने एकमेकांच्या हातावर फ्रेंडशिप बॅन्ड बांधत दोघींनी मैत्री केली आहे. त्यामुळे आता दोघींमधील वैर संपण्याची शक्यता आहे. एकमेकींच्या कट्टर आणि व्यवसायिक प्रतिस्पर्धक मानल्या जाणाऱ्या गौतमी पाटील-माधुरी पवार यांच्यातील वादावर आता पडदा पडणार आहे. विशेष म्हणजे फक्त राजकारणातच नाही तर आता मनोरंजन क्षेत्रातही अशा घडामोडी बघायला मिळताना दिसत आहे. पुण्यातील कार्यक्रमात दोघींचा वाद मिटवून एकत्र आणण्यासाठी अभिनेता सुभाष यादव याने प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. माधुरी पवार हिने वारंवार गौतमी पाटील हिच्यावर टीका केली होती. पण आता दोघीजणी आपला वाद विसरून एकत्र आल्या आहेत. दोघींच्या मनोमिलनामुळे सांस्कृतिक क्षेत्रात विविध चर्चा रंगवल्या जात आहेत.