‘माझ्या समोर ये….’, गौतमी पाटील हिचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे याला इशारा
VIDEO | 'माझी लग्नाची इच्छा...', बीडच्या तरुणाच्या पत्रावर गौतमी पाटील नेमकं काय म्हणाली
पुणे : ‘आता ताईला समजून सांगणे गरजेचे आहे, नाहीतर मी ताईला ओपन चॅलेंज देतो त्यांनी बिहारमध्ये जावं. तुम्ही बदल करणार नसाल तर महाराष्ट्रात तुम्हाला थारा नाही’, असा इशारा छोटा पुढारी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे याने गौतमी पाटील हिला दिला. यावर गौतमी पाटील हिने भाष्य केले आहे. “मी घनश्यामला एकच सांगते, तू आधी माझ्या कार्यक्रमाला ये. माझा कार्यक्रम बघ. त्यानंतर काही आरोप करायचे असतील तर कर. आधी मला दाखव की मी काय चुकतेय. तू डायरेक्ट माझ्यावर आरोप करशील तर मी सुद्धा ऐकून घेणार नाही. माझी चूक दिसू तर दे. तू आधी कार्यक्रम बघ मग बोल”, अशी शब्दांत गौतमीने घनश्याम दरोडेला उत्तर दिलं. दिलीप मोहिते पाटील यांनी गौतमीचं कौतुक केलं. त्यानंतर गौतमीने दिलीप मोहिते यांचे आभार मानले आहेत. दिलीप मोहिते यांना आपण आज पहिल्यांदाच भेटलो, त्यांनी कलाकाराची जाण राखली, असं गौतमी पाटील म्हणाली. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसनिमित्ताने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान गौतमीने टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. त्यावेळी ती बोलत होती.