मुख्यमंत्री शिंदे यांना शिवीगाळ अन् दत्ता दळवी यांना अटक, राऊत यांनाही होणार अटक?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्यानं ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांनी मुंबई पोलिसांकडून अटक, मात्र न्यायलयीन कोठडी मिळूनही जामीन मिळू न शकल्याने त्यांना ठाण्याच्या जेलमध्ये रवानगी, तर दुसरीकडे दत्ता दळवी यांच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड
मुंबई, ३० नोव्हेंबर २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्यानं ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांनी मुंबई पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. मात्र न्यायलयीन कोठडी मिळूनही जामीन मिळू न शकल्याने त्यांना ठाण्याच्या जेलमध्ये पाठवण्यात आले. तर दुसरीकडे दत्ता दळवी यांच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. भांडूप येथील दळवींच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये शिरून अज्ञातांनी त्यांची गाडी फोडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आली आहे. तिघे गाडी फोडताय तर एक जण त्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करतोय. दरम्यान दत्ता दळवी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. जामीनावर कोणतंही उत्तर न आल्याने अखेर ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात दत्ता दळवी यांची रवानगी झाली. बघा यानंतर राजकीय वर्तुळातून कोणत्या नेत्यानं काय म्हटलं?