पुढे द्रौपदीचा विचार… मुलींच्या जन्मदरासंदर्भातील अजितदादांच्या अजब वक्तव्याची चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात आज एक अजबच वक्तव्य केलंय. मुलींच्या जन्मदरासंदर्भात बोलताना अजित पवारांनी हे विधान केलं. राज्याच्या उपमुख्यमत्र्यांनी अशाप्रकारचं वक्तव्य केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय म्हणाले अजित पवार? बघा व्हिडीओ
पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात आज एक अजबच वक्तव्य केलंय. मुलींच्या जन्मदरासंदर्भात बोलताना अजित पवारांनी हे विधान केलं. राज्याच्या उपमुख्यमत्र्यांनी अशाप्रकारचं वक्तव्य केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले गंमतीचा भाग सोडा पण मला कोणाचा अपमान करायचा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक जिल्ह्यांमध्ये मुला- मुलींच्या जन्मदरात तफावत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. “आम्ही मधल्या काळात बघितलं, मुला-मुलींच्या जन्मदरात काही जिल्ह्यांमध्ये एवढी तफावत बघायला मिळाली की, 1000 मुले जन्माला आले की त्यावेळेस 800 ते 850 मुली जन्माला येत होत्या. पण हा दर 790 पर्यंत गेला. मी म्हटलं, पुढे तर अवघडच होणार आहे. पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय? असा प्रसंग त्यावेळेस येईल”, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.