Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Video : 'ते कधी निवडून...', राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अजितदादांचा खोचक टोला

Ajit Pawar Video : ‘ते कधी निवडून…’, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अजितदादांचा खोचक टोला

| Updated on: Mar 24, 2025 | 11:28 AM

एका खोक्या भाईचं काय घेऊन बसलात, इथे संपूर्ण विधानसभेत खोके भाईच भरले आहेत, असा खोचक टोला राज ठाकरेंनी सरकारला लगावला. मुंबईत मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यातून राज ठाकरेंनी नेत्यावर टीका केली.

एक खोक्याभाई काय घेऊन बसलात अख्खी विधानसभा भरलेली आहे, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल केल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर आत सगळे खोक्याभाईच भरलेत असंही राज ठाकरे म्हणाले. मनसेच्या पदाधिकारी बैठकीत राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. काल मुंबईत मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात पालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली. त्यासोबतच राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज ठाकरेंनी सरकारवर टोलेबाजी केली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस आणि त्यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याची चांगलीच चर्चा आहे. यावरुनच राज ठाकरेंनी सरकारला हा टोला लगावला. खोक्या भोसले याच्यावरून राज ठाकरे यांनी नेत्यांवर टीका करत निशाणा साधला. तर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंनाच खोचक टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेत सगळेच खोक्याभाई आहेत, असं राज ठाकरे म्हणाले, असा प्रश्न अजित पवार यांना पत्रकारांनी केला असता, ‘ते कधी निवडून आले?’, असा खोचक सवाल अजित पवार यांनी केला.

Published on: Mar 24, 2025 11:18 AM