Ajit Pawar : ‘ओ तुम्ही गाड्या घ्या ना, कलेक्टर..’, अजितदादा वैतागले; तकड ऑर्डर केल्या 2 नव्या गाड्या
DCM Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवार यांच्या सेवेत असलेली गाडी खराब असल्याने चांगलेच भडलेले बघायला मिळाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते चांगलेच वैतागलेले बघायला मिळाले. अजितदादा ज्या गाडीमधून आले त्या गाड्या ताबडतोब बदलण्याच्या सूचना यावेळी अजित पवारांनी दिल्या आहेत. कोल्हापुरात पोहोचून गाडीमधून खाली उतरल्यावर लागलीच अजित पवार यांनी ‘थोडा लेट झाला पालकमंत्री महोदय आम्हाला’, असं म्हणत आपला मोर्चा थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे वळवला. ‘तुम्ही गाड्या घ्या ना कलेक्टर.. मी आत्ताच्या आत्ता इथं 2 गाड्यांची ऑर्डर देतो. आधी हे बदला’ असं म्हणत अजित पवारांनी गाडी बदलण्याच्या सूचना केल्या आहेत. कोल्हापूर दौऱ्यात अजित पवारांच्या सेवेत देण्यात आलेली गाडी ही खराब असल्याचं म्हणत अजित पवार चांगलेच भडलेले बघायला मिळाले. यावेळी वैतागून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गाडी बदलण्याच्या सूचना केल्या आहेत.