निधी वाटपावरून नाराज? अजितदादांनी घेतली अमित शाह यांची भेट, ‘त्या’ ४५ मिनिटांत काय चर्चा?
नाराजीमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी अजितदादांनी निधीवाटपावरून अमित शाहांकडे तक्रार केल्याची माहिती आहे. शुक्रवारी बाणेरमध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन थेट अमित शाह यांची भेट घेतली.
मुंबई, १४ नोव्हेंबर २०२३ | दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत तडकाफडकी भेट घेतली. तर नाराजीमुळे अजितदादांनी ही भेट घेतली असून निधीवाटपावरून तक्रार केल्याची माहिती आहे. शुक्रवारी बाणेरमध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन थेट अमित शाह यांची भेट घेतली. तर असेही सांगितले जातेय की, ४५ मिनिटांत झालेल्या भेटीमध्ये विकासनिधीवरून महायुतीत नाराजी नाट्य सुरू झाल्याचं कळतंय. विकासनिधीवरून समानता नाही, अशी अजित पवार यांनी शाहांकडे तक्रार केल्याची माहिती आहे. तर शिंदे गटाला अधिक निधी मिळत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय. यासह मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारावरूनही दादांनी नाराजी व्यक्त केली आहे. महामंडळाचं वाटपही झालेलं नाही, यावरूनही अजित दादांनी खंत व्यक्त केली आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा

'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी

मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले

पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
