राज ठाकरेंकडून आधी नक्कल अन् आता जितेंद्र आव्हाड यांची टीका, बघा अजितदादांची केली मिमिक्री

राज ठाकरेंकडून आधी नक्कल अन् आता जितेंद्र आव्हाड यांची टीका, बघा अजितदादांची केली मिमिक्री

| Updated on: Jan 04, 2024 | 12:03 AM

अजित पवार यांची मिमिक्री करत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या दिवशी अजित पवार यांनी केलेल्या विधानांवर राज ठाकरे यांनी मिमिक्री तर आता निधीवाटपावरून जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्त्र डागलं

मुंबई, ३ जानेवारी २०२४ : अजित पवार यांची मिमिक्री करत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या दिवशी अजित पवार यांनी केलेल्या विधानांवर राज ठाकरे यांनी मिमिक्री केली होती. तर आता निधीवाटपावरून जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्त्र डागलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा विरोधी पक्षांच्या आमदारांना निधी मिळत नाही, असा आरोप केला जात होता. मात्र आता महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून तसाच भेदभाव सुरू असल्याचा आरोप सातत्याने केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या निधी वाटपावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेदभाव होत असल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता. तोच आता पुन्हा केल्याचे पाहायला मिळाले. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अजित पवार यांची मिमिक्री करण्यात आली तर निधीवाटपातही दादागिरीत करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Published on: Jan 03, 2024 11:58 PM