Hasan Mushrif म्हणाले, कोल्हापुरातील मोठे प्रश्न अजित पवार यांच्यामुळे मार्गी लागले अन्…
VIDEO | कोल्हापुरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेसाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून जोरदार तयारी, बघा कशी सुरूये शक्तीप्रदर्शनाची तयारी? अजित पवार यांची सभा उद्या कोल्हापुरातील तपोवन मैदानात होणार
कोल्हापूर, ९ सप्टेंबर २०२३ | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा उद्या कोल्हापुरातील तपोवन मैदानात होणार आहे. या सभेच्या तयारीची पाहणी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून करण्यात येत आहे. सभास्थळासह वाहनांच्या पार्किंगच्या ठिकाणांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी कोणाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना हसन मुश्रीफ यांनीपदाधिकाऱ्यांना दिल्या. तर कोल्हापूराताली मोठे प्रश्न अजित दादा यांच्यामुळेच आतापर्यंत मार्गी लागले असल्याच त्यांनी म्हटले. उद्याची होणारी सभा कोणाला उत्तर देण्यासाठी नाही तर कोल्हापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी अजितदादा पवार यांनी याआधी केलेल्या सहकार्य आणि पुढील काळातील सहकार्यासाठी ही सभा असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. शरद पवार हे आमचेच नेते आहेत त्यांच्यामुळेच आम्ही मोठे झालो आहोत, असा पुनरुचार देखील यावेळी हसन मुश्रीफ यांच्याकडून करण्यात आला आहे.