‘लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू’, गोपीचंद पडळकर यांच्या टीकेवर अजित पवार थेट म्हणाले…
VIDEO | अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केली होती, या टीकेवर अजित पवार यांनी केला पलटवार करत दिलं प्रत्युत्तर
पुणे-पिंपरी, २४ सप्टेंबर २०२३ | राज्यातमध्ये वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. अशा विधानावर मत व्यक्त करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा गोष्टीकडे मी लक्ष देत नाही. त्यांच्यावर बोलण्यापेक्षा मी माझ्यावर कामावर लक्ष देतो, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केली होती. या टीकेवर राजकीय वर्तुळात चांगलेच आरोप प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले होते. तर आता गोपीचंद पडळकर यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी चांगलेच फटकारत जोरदार हल्लाबोल केला आहे. अजित पवार पुण्यातील पिंपरी येथे बोलत होते.