भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतरही जुन्या भूमिकांवर अजित दादा ठाम, आता मुस्लीम आरक्षण?

tv9 Special Report | मुस्लीम आरक्षणावर भाजप आणि शिंदे गटाची भूमिका नेमकी काय ? मात्र अजितदादा पवार आग्रही मुस्लीम आरक्षणावर अजित दादांच्या गटाची भूमका काय ? बघा स्पेशल रिपोर्ट.....

भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतरही जुन्या भूमिकांवर अजित दादा ठाम, आता मुस्लीम आरक्षण?
| Updated on: Sep 24, 2023 | 8:09 AM

मुंबई, २४ सप्टेंबर २०२३ | भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतरही अजित पवार आपल्या जुन्या भूमिकांवर ठाम आहेत. मुस्लीम आरक्षणाबाबत अजित पवार भाजप आणि शिंदे गटाशीही चर्चा करणार आहेत. अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. मात्र आपल्या जुन्या भूमिका सोडण्यास ते तयार नाहीत. त्याचीच एक झलक आहे, मुस्लीम आरक्षण. महाराष्ट्रात मुस्लीमांना आरक्षण देण्यासाठी अजित पवार आग्रही असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार असल्याचं कळतंय.2014मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारनं मुस्लीम समाजाला आरक्षणाची घोषणा करत निवडणुकीच्या तोंडावर थेट अध्यादेशच काढला होता. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मुस्लीम समाजाला 5% आरक्षणाची घोषणा तत्कालीन आघाडी सरकारनं केली होती. मात्र मुंबई हायकोर्टानं नोकऱ्यांमधलं आरक्षण फेटाळलं, पण शिक्षणातलं 5% आरक्षण फेटाळलं नाही पण अद्याप शिक्षणासाठीही मुस्लिमांना आरक्षण देण्याची अंमलबजावणी झालेली नाही. आता अजित पवारांनीही मुस्लीम आरक्षणासाठी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Follow us
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....