Maratha Reservation Protest | मराठा आंदोलकांवरील पोलिसांच्या लाठीचार्जचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण, म्हणाले...

Maratha Reservation Protest | मराठा आंदोलकांवरील पोलिसांच्या लाठीचार्जचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण, म्हणाले…

| Updated on: Sep 01, 2023 | 10:26 PM

VIDEO | जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्ज घटनेवर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं या घटनेवर काय म्हणाले बघा...

जालना, १ सप्टेंबर २०२३ | जालन्यात मराठा आंदोलकांवर करण्यात आलेला पोलिसांकडून लाठीचार्ज या घटनेमुळे राज्यात एकच गदारोळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, जालन्यातील घटना खरोखर दुर्देवी आणि गंभीर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: त्याठिकाणी असलेल्या उपोषणकर्त्यांशी बोललो होते. आमचा विविध प्रकारे संवाद सुरु होता. त्यांनी उपोषण मागे घ्यावं, कारण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीरपणे काम करत आहे. पण हा विषय न्यायालयाशी संबंधित विषय आहे. तर उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. ही राज्याची जबबादारी आहे की, अशाप्रकारे उपोषण होत असेल, तब्येत खबार होत असेल तर त्यांना रुग्णालयात दाखल करणं जरुरीचं आहे. प्रशासन कालही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेलं होतं. पण त्यांनी तुम्ही उद्या या, असं सांगितलं. प्रशासन आज पुन्हा गेलं आणि विनंती केली. पण आज पोलिसांना घेरुन दगडफेक करण्यात आली म्हणून तिथे लाठीचार्ज करण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले.

Published on: Sep 01, 2023 10:22 PM