रूप पाहता लोचनी… उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न
. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा आज संपन्न झाली. गुरूवारी पहाटे 2:20 वाजता सुरु झालेली शासकीय महापूजा 3:25 ला समाप्त झाली. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शासकीय महापूजा करण्याचा मान कोणत्या वारकरी दाम्पत्याला मिळाला?
पंढरपूर, २३ नोव्हेंबर २०२३ : आज कार्तिक एकादशी असल्याने पंढरपुरातील शासकीय महापूजेचा मान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा आज संपन्न झाली. गुरूवारी पहाटे 2:20 वाजता सुरु झालेली शासकीय महापूजा 3:25 ला समाप्त झाली. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शासकीय महापूजा करण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातल्या मानदुमला गावच्या बबन घुगे आणि वत्सला घुगे यांना मिळाला. या दोन्ही दाम्पत्यांकडून विठुरायाची साग्रसंगीत महापूजा झाली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी विठ्ठलाची कृपा सदैव महाराष्ट्रावर राहू देत, सर्वांना सुखी ठेव, अशी प्रार्थना देवेंद्र फडणवीस यांनी विठुरायाचरणी केली. तर आज पुन्हा एकदा सपत्नीक शासकीय पूजा करण्याचे सौभाग्य प्राप्त झाल्याचेही त्यांनी म्हटले.