अशोक चव्हाणांना कुठल्या पदाची अपेक्षा? देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं?
अशोक चव्हाण यांची मदत कुठे घ्यायची हे आम्हाला माहीत आहे. योग्यवेळी मदत घेऊ. त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय अनुभवाचा आम्ही फायदा घेणार आहोत. त्यांचा दीर्घ अनुभव आहे, अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेतृत्व, ज्यांनी राज्यातील विधानसभा अनेक वर्ष गाजवली, देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली, विविध मंत्रीपदं त्यांनी भूषवली, दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकिर्द पाहायला मिळाली असे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. पुढे फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांना कुठल्या पदाची अपेक्षा आहे? यावर असे म्हटले की, भाजपमध्ये अशोक चव्हाण आणि अमर राजूकरक यांचं स्वागत करतो. निश्चितच त्यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात भाजपची आणि महायुतीची शक्ती भक्क झाली आहे. वाढली आहे. देशभरात मोदी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं सुरू केलं. जो बदल देशभरात दिसू लागला आहे. त्यामुळे देशभरातील नेत्यांना आपणही मुख्यप्रवाहात काम करावं, मोदीजींसारख्या नेतृत्वासोबत काम करावं, मोदींचा प्रयत्न आहे, त्यात आपणही वाटा उचलावा असा विचार नेत्यांमध्ये आला. त्यात प्रमुख नेतृत्व म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहू शकतो. चव्हाण यांनी बिनशर्त प्रवेश केला. विकासाच्या मुख्यधारेत योगदान देण्याची मला संधी द्या. मला पदाची अपेक्षा नाही, लालसा नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले. आणि आम्हाला आनंद आहे, खरं म्हणजे त्यांचा प्रवेश झाला. मी त्यांचं स्वागत करतो.