Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणातील एक अनमोल रत्न म्हणजे आमचे गिरीशभाऊ; आठवणी सांगताना देवेंद्र फडणवीस गहिवरले

राजकारणातील एक अनमोल रत्न म्हणजे आमचे गिरीशभाऊ; आठवणी सांगताना देवेंद्र फडणवीस गहिवरले

| Updated on: Mar 30, 2023 | 7:45 AM

Girish Bapat Passed Away : आमदार निवासात आम्ही एकत्र राहायचो तेव्हा गिरीशभाऊ आमच्यासाठी जेवण बनवायचे, या आठवणी सांगत असताना देवेंद्र फडणवीस यांचे डोळे पाणवले. फडणवीस नेमकं काय म्हणालेत? पाहा...

पुणे : भाजपचे वरिष्ठ नेते, खासदार गिरीश बापट यांचं काल निधन झालं. त्यांच्या पार्थिवावावर काल संध्याकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आठवणी सांगितल्या. गिरीश बापट यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना फडणवीस यांचे डोळे पाणावले. “मॅजेस्टिक आमदार निवासात आम्ही 15 वर्ष एकत्र राहिलो, तेव्हा गिरीशभाऊ आमच्यासाठी आपुलकीने जेवण बनवायचे. सगळ्यांना प्रेमाने खाऊ घालायचे. शिपाई असो की मंत्री प्रत्येकाशी तेवढ्याच आपुलकीने, मैत्रीपूर्ण भावनेने वागणारा नेता आज हरपला. ही हानी कधीही भरून न निघणारी आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Published on: Mar 30, 2023 07:40 AM