Devendra Fadnavis यांनी Manoj Jarange Patil यांच्याशी फोनवरुन साधला संवाद अन्…, काय झालं बोलणं?
VIDEO | मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून चर्चा झाली, कोणावरही चुकीचा गुन्हा दाखल झाला असेल तर तो मागे घेतला जाईल, फडणवीसांचे आश्वासन
मुंबई, ४ सप्टेंबर २०२३ | जालन्यात मराठा आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला भेटण्याचे निमंत्रण दिले असून तुमच्या मागणीवर चर्चा करण्यासही सांगितले आहे. तर यासोबतच या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. या काळात जे काही घडले ते रोखता आले असते. पोलिसांना लाठीचार्जही थांबवता आला असता. सरकार अशा लाठीचार्जचे कधीही समर्थन करत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तर या घटनेला कुणी जबाबदार अधिकारी असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले आहे. कोणावरही चुकीचा गुन्हा दाखल झाला असेल तर तो मागे घेतला जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. या प्रश्नावर चर्चेतूनच तोडगा निघू शकतो, असे त्यांनी पाटील यांना सांगितले.