पुरानी यादें ताजा हो गई… अयोध्येत जातानाचा स्वत:चा फोटो देवेंद्र फडणवीसांकडून ट्वीट, कारसेवेचा दिला पुरावा
ज्या कारसेवकांचं स्वप्न होतं, अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाला विराजमान करण्याचं ते उद्या पूर्ण होणार आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो ट्विट केला. हा फोटो नागपूर रेल्व स्टेशनवरचा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुंबई, २१ जानेवारी २०२४ : अयोध्येतील राम मंदिराचं उद्या म्हणजेच २२ जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. ज्या कारसेवकांचं स्वप्न होतं, अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाला विराजमान करण्याचं ते उद्या पूर्ण होणार आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो ट्विट केला. हा फोटो नागपूर रेल्व स्टेशनवरचा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नागपुरहून अयोध्येत जात असतानाचा स्वत: चा फोटो फडणवीसांनी टि्वट केला. हा फोटो ट्वीट करून अयोध्या कारसेवेला गेल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुरावा दिला आहे. जुनी आठवण असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी त्या फोटोला शेअर केले आहे. तर ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.’, असे कॅप्शन दिलंय.