‘गर्दीच्या ठिकाणी ये, कधी ठार मारेण कळणार ही नाही’; खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या मध्यंतरी हनुमान चालिसावरून चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर त्यावर सुनावणी देखील सुरू झाली आहे. याचदरम्यान एका अज्ञातावर गुन्हा दाखल झाल्याने तर त्याचा थेट संबंध खासदार नवनीत राणा यांच्याशी आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे.
अमरावती : 22 ऑगस्ट 2023 | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मध्यंतरी त्या हनुमान चालिसा म्हणण्यावरून चांगल्याच चर्चेत होत्या. तर आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. यावेळी मात्र त्यांच्याबाबत धक्कादायक बाब समोर आली असून एका अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळासह अमरावतीत खळबळ उडालेली आहे. खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून याबाबत अमरावतीच्या राजापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका अज्ञात व्यक्तिने त्यांना फोनवरून ही धमकी दिली आहे. तर तुम्ही गर्दीत फार जाता. तुमच्यावर त्याच गर्दीत चाकूने सपासप वार करून कधी तुम्हाला ठार मारणार हे कळणार देखील नाही अशी धमकी देण्यात आली आहे. यानंतर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर खासदार नवनीत राणा यांच्या मोबाईलवर विठ्ठलराव नावाच्या व्यक्तीने फोन केला असून त्यानेच धमकी दिल्याचे समोर येत आहे. तर खासदार नवनीत राणा यांना गेल्या सात ते आठ दिवसांपासून विठ्ठलराव जीवे मारण्याची धमकी देत होता.