असंच बोलत राहिलात तर दाभोळकर करू, यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

“असंच बोलत राहिलात तर दाभोळकर करू”, यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

| Updated on: Jul 31, 2023 | 12:26 PM

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्याला काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. आमदार यशोमती ठाकूर यांनी देखील संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आता यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

अमरावती , 31 जुलै 2023 | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्याला काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. आमदार यशोमती ठाकूर यांनी देखील संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आता यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरवरून ही धमकी देण्यात आली आहे. असंच बोलत राहिलात तर दाभोळकर करू, असा इशारा धमकी देणाऱ्या व्यक्तीने यशोमती ठाकूर यांना दिला आहे. या धमकी प्रकरणावर यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Published on: Jul 31, 2023 12:26 PM