संजय राऊत यांच्या 'त्या' टीकेवर दीपक केसरकर यांचा पलटवार, बघा काय दिलं प्रत्युत्तर?

संजय राऊत यांच्या ‘त्या’ टीकेवर दीपक केसरकर यांचा पलटवार, बघा काय दिलं प्रत्युत्तर?

| Updated on: Nov 19, 2023 | 3:37 PM

संजय राऊत यांच्या आरोपांवर मंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे स्वत:ला महाराष्ट्र म्हणून घेत आहेत. पण एखादी कोणतीही व्यक्ती किंवा संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र हा खूप मोठा आहे आणि महाराष्ट्र हा महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, असे केसरकर म्हणाले

जळगाव, १९ नोव्हेंबर २०२३ : दोन गुजराती नक्की गाडले जातील, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. तर 2024 पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पासपोर्ट जप्त करा, ते देश सोडून पळून जाणार आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या आरोपांवर मंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे स्वत:ला महाराष्ट्र म्हणून घेत आहेत. पण एखादी कोणतीही व्यक्ती किंवा संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र हा खूप मोठा आहे आणि महाराष्ट्र हा महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. महाराष्ट्र हा संजय राऊत यांची ही खाजगी मालमत्ता नाही.

Published on: Nov 19, 2023 03:36 PM