मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली? दीपक केसरकर म्हणतात…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्वच आमदार, खासदार आणि नेत्यांची सोमवारी तातडीने बैठक बोलावली. वरळीच्या एनएससीआय सभागृहामध्ये ही बैठक बोलावण्यात आली होती. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्वच आमदार, खासदार आणि नेत्यांची सोमवारी तातडीने बैठक बोलावली. वरळीच्या एनएससीआय सभागृहामध्ये ही बैठक बोलावण्यात आली होती. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पण या बैठकीत सध्याच्या राजकीय हालचालींवरही खलबतं झाल्याची शक्यता आहे. कालच्या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली यावर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे. “शिवसेनेचा वर्धापन दिन 19 तारखेला होणार आहे यासाठी त्याची ही पूर्व बैठक होती. राज्यभरातून पदाधिकारी आले होते, मुख्यमंत्री शिंदे यांनीही मार्गदर्शन केलेलं आहे. पुढची रुपरेषा या बैठकीत ठरवण्यात आली. तसेच आमचं सरकार युतीत चांगलं काम करत असल्याचं, सर्व्हेतून समोर आलेलं आहे. येणाऱ्या सर्व निवडणुका एकत्र लढवणार आहोत. युतीही अखंड आहे विरोधीपक्ष काहीही बोलतील त्यावर विश्वास ठेवू नका. राऊत जेवढं बोलतील तेवढी माणसं त्याना सोडून जातील. बाळासाहेबांच्या विचारानेच पुढे काम करायचं हा ठराव आजच्या बैठकीत झाला”, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.