AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Attack : छुप्या दहशतवादी कारवायांवर आता 'ध्रुव'ची नजर, पहलगाम हल्ल्यानंतर आर्मीचा मोठा निर्णय

Pahalgam Attack : छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ‘ध्रुव’ची नजर, पहलगाम हल्ल्यानंतर आर्मीचा मोठा निर्णय

| Updated on: Apr 26, 2025 | 3:23 PM

काश्मीरमधील छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर असणार आहे. कारण हेलिकॉप्टर ध्रुव वापरण्यास संरक्षण मंत्रालयाकडून लष्कराला परवानगी देण्यात आली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने पुन्हा एकदा मॉडर्न लाइट हेलिकॉप्टर (ALH) ध्रुवचे उड्डाण पूर्ववत केले आहे. लष्कर, नौदल, हवाई दल आणि तटरक्षक दलाने चालवलेल्या 330 हून अधिक ध्रुव हेलिकॉप्टरचा संपूर्ण ताफा जानेवारीमध्ये एक हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर ध्रुवच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये मदत करण्यासाठी लष्कराने एएलएच ध्रुवला मर्यादित उड्डाणाची परवानगी दिली आहे.

स्वदेशी हेलिकॉप्टर ‘ध्रुव’ हे 5.5 टन वजनाच्या वर्गातील डबल इंजिन असणारं मल्टी-रोल हेलिकॉप्टर आहे. ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ने आतापर्यंत 340 हून अधिक ध्रुव हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे. हे हेलिकॉप्टर सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी वापरले जाते. इतर हेलिकॉप्टरच्या तुलनेत ते वेगाने उड्डाण करू शकते आणि कमी जागेतही उतरू शकते. दहशतवादी धोका लक्षात घेता लष्कराने त्याच्या वापरासाठी मर्यादित परवानगी दिली आहे. सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि घुसखोरी रोखण्यासाठी आता हे हेलिकॉप्टर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Published on: Apr 26, 2025 03:23 PM