Bulli Bai app Case | बुली बाई अॅप प्रकरणातील आरोपीची आत्महत्येची धमकी -tv9

Bulli Bai app Case | बुली बाई अॅप प्रकरणातील आरोपीची आत्महत्येची धमकी -tv9

| Updated on: Jan 08, 2022 | 8:33 PM

पोलिसांनी धाडसत्र टाकत नीरज बिष्णोई याला अटक केली, मात्र आता त्याने पोलिसांना कोठडीत आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

“सुल्ली डिल” अॅप बनवणारा नीरज बिष्णोई सध्या पोलीस कोठडीत आहे, मुस्लिम महिलांबद्दल आरक्षेपार्ह पोस्ट या अॅपवर केल्या जात होत्या, या अॅपवर मुस्लिम महिलांचे फोटो टाकून, त्यांची किंमत ठरवली जात असल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता, त्यानंतर राज्य शासन आणि महिला आयोगाकडून या प्रकरणाची तातडीने दखल घेत, गृहमंत्र्यांनी याप्रकरणी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी धाडसत्र टाकत नीरज बिष्णोई याला अटक केली, मात्र आता त्याने पोलिसांना कोठडीत आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

नीरज बिष्णोईला आसाममधून अटक

नीरज बिष्णोई याला आसाम राज्यातून अटक करण्यात आली आहे, दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने याच्या मुसक्या आवळ्या आहेत, या प्रकरणी तो गेल्या दोन दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे. यावेळी तो तपासात सहकार्य करत नाही, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. कोठडीत असताना त्याने दोनदा स्वतःच स्वतःवर जखमा करण्याचा प्रयत्न केला, असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.