भडखाऊ विधानं करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांना अटक करा, कुणाची आक्रमक मागणी?
VIDEO | महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करताना शांतपणे दिसत आहेत. परंतु याच पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते भडखाऊ विधाने करत असल्याचा आरोप सचिन खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केला आहे
मुंबई, २६ ऑक्टोबर २०२३ | आज सकाळी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची मराठा क्रांती मोर्च्याच्या युवकांनी तोडफोड केली. यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष (सचिन खरात गट) सचिन खरात यांनी भाष्य केले. महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करताना शांतपणे दिसत आहेत. परंतु याच पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते भडखाऊ विधाने करत असल्याचा आरोप सचिन खरात यांनी केला. दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. या झालेल्या तोडफोडीचे समर्थन कोणीही करू शकत नाही, असेही ते म्हणाले. परंतु गुणरत्न सदावर्ते यांनी बोलताना तारतम्य बाळगायला हवे, यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे राज्य सरकारला मागणी करताय की तात्काळ भडखाऊ विधानं करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांना अटक करावी, अशी मागणी सचिन खरात यांनी केली.