“आता कुठे आहे तुमची विचारधारा?” फडणवीस यांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा
एका निर्णयामुळे काँग्रेसवर भाजपकडून हल्लाबोल केला जात आहे. कर्नाटकात घेण्यात आलेल्या निर्णयाचा महाराष्ट्राच्या राजकारण परिणाम उमटत आहेत. कर्नाटकात काँग्रेसने वीर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि केशव बळीराम हेडगेवार यांना शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकले.
धाराशिव : कर्नाटकात काँग्रेस सत्तेत येताच अनेक घोषणांचा जसा पाऊस केला तसाच त्या पुर्ण करण्यासाठी पाऊस ही उचलले. त्यामुळे काँग्रेस सरकारची चर्चा झाली. मात्र आता एका निर्णयामुळे काँग्रेसवर भाजपकडून हल्लाबोल केला जात आहे. कर्नाटकात घेण्यात आलेल्या निर्णयाचा महाराष्ट्राच्या राजकारण परिणाम उमटत आहेत. कर्नाटकात काँग्रेसने वीर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि केशव बळीराम हेडगेवार यांना शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकले. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांना फटकारलं आहे. फडणवीस यांनी ठाकरेंना थेट सवाल करत आता कुठे आहे तुमची विचारधारा? असा सवाल केला आहे. तर याच्याआधी ठाकरे यांनी राहुल गांधींना सावरकर यांच्यावर इशारा देताना सावरकरांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही असं सांगितलं होतं. त्यानंतर आता कर्नाटक सरकारनं तेथे हा निर्णय घेतला आहे. ज्यावरून वीर सावरकरांच्या अपमानावर उद्धव ठाकरेंना काय म्हणायचे आहे? हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हिंदूत्त्व सोडून दिले, हे एकदा त्यांनी जाहीर करून टाकावे. सत्तेसाठी लाचारी पत्करणार तरी किती, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.