AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नानाभाऊ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक उंची पण असावी लागते : Devendra Fadnavis

| Updated on: Jan 17, 2022 | 8:05 PM

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यासह अनेक भाजप नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी पटोले यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण आता पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झालीय. पटोले यांनी ‘मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो’, असं वक्तव्य केलं आहे. त्याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होतोय. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोटोले यांनी याबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. ‘पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो…काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही ? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते!’ असं ट्वीट करत फडणवीस यांनी पटोलेंवर जोरदार निशाणा साधला आहे.