Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री बनल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच नागपुरात, फडणवीसांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रथमच ठाण्यातील त्यांच्या घरी गेले. यावेळी त्यांचं धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. ढोलताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचं स्वागत झालं. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आज नागपुरात जात असून त्याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
नागपूर : राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि भाजप (BJP) यांचं सरकार सत्तेत आलंय. एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचा नुकताच शपथविधी झाला. तर विधानसभेतील दोन दिवसीय विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारनं बहुमतापेक्षा मोठा आकडा गाठून आपलं सरकार मजूबत असल्याचं दाखवून दिलंय. दरम्यान, काल राज्याचे मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रथमच ठाण्यातील त्यांच्या घरी गेले. यावेळी त्यांचं धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. ढोलताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचं स्वागत झालं. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात जात असून त्याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. त्यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली. फडणवीसांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्ते उत्सुक आहेत. फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील नागपुरात जात आहेत.