Highlights of Budget 2023 : देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्पाचं कौतुक, विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना म्हणाले…
आज देशाचा अर्थसंकल्प सादर झालाय. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी या अर्थसंकल्पाचं कौतुक केलंय. पाहा काय म्हणालेत...
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करत आजचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. विकसित राष्ट्राकडे जाण्याच्या मार्गातील महत्वाचा दुवा हा यंदाचा अर्थसंकल्प आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. आजच्या अर्थसंकल्पावर काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणतंही बजेट सादर झालं की काँग्रेसची प्रतिक्रिया ठरलेली असते. त्यामुळे त्यांच्या टीकेवर बोलण्यात काहीही अर्थ नाही, असंही फडणवीस म्हणालेत.
Latest Videos