नाशिक शहरात नेमकं चाललंय काय? पंचवटी परिसरात एकाच रात्रीत तीन मंदिरांमध्ये चोऱ्या
गेल्या काही दिवसापासून नाशकात गुन्हेगारी फोफावली आहे. येथे चार आठवड्यात चार खुनाच्या घटना घडल्या असून चोऱ्यामाऱ्या ही होत आहेत. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.
नाशिक : 26 ऑगस्ट 2023 | नाशिक शहरात कायदा आणि सुव्यस्था आहे की नाही अशीच स्थिती उद्भवली आहे. यामुळे आता पोलिस प्रशासना ऐवजी थेट गृहमंत्र्यांनीच येथे लक्ष घालावं अशी मागणी नाशिककरांनी केली आहे. त्यामुळे नाशकात सध्या नेमकं काय सुरू आहे असेच प्रश्न आता सर्व सामान्यांना पडताना दिसत आहेत. नाशिक शहरात गेल्या काही दिवसापासून हाणामाऱ्यांसह भर रस्त्यात खुनाच्या घटना घडल्याने भीती पसरली आहे.
येथे चार आठवड्यात भर रस्त्यात चार खून झाले आहेत. त्यामुळे सामान्य नाशिककर आता भयभीत झाला असून येथे नेमकं काय चाललंय असा संतप्त सवाल विचारू लागले आहेत. तर मंदिरांचा परिसर म्हणून ओळख असलेल्या पंचवटी परिसरात एकाच रात्रीत चोरट्यांनी दोन ते तीन मंदिरांमध्ये चोऱ्या करत एका घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे नाशिक दत्तक घेतलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता तरी किमान नाशिककडे लक्ष द्यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे.