Dhananjay Munde : धनंजय मुंडेंकडून खंडणी मागितल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा, खंडणी मागणारी महिला कोण?

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंकडून खंडणी मागितल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा, खंडणी मागणारी महिला कोण?

| Updated on: Apr 21, 2022 | 9:24 AM

मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून खंडणी मगितल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे

मुंबई : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडून खंडणी मगितल्याची तक्रार पोलिसात (Police Complaint) देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका परिचित महिलेने 5 कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार धनंजय मुंडे यांनी दिली होती. खंडणी न दिल्यास बलात्काराची तक्रार करण्याची धमकी दिल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी या महिलेविरोधात आपल्या तक्रारीत केला आहे. मुंबईच्या मलबार हिल पोलीस (Malbar Hill Police Station, Mumbai) ठाण्यात याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण सध्या क्राईम ब्रांचला वर्ग करून तपासाला देण्यात आलंय. सध्या क्राईम ब्रांच पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, खंडणी मागून धनंजय मुंडे यांना धमकावणारी ही महिला कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.