धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिश्चार्ज, प्रकृती चांगली असल्याची डॉक्टरांची माहिती
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांना रुग्णालयातून डिश्चार्ज मिळाला आहे. सध्या त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांना रुग्णालयातून डिश्चार्ज मिळाला आहे. सध्या त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach candy Hospital) त्यांना भरती करण्यात आलं होतं. 12 एप्रिल रोजी यांना दुपारी अचानक काही अस्वस्थता जाणवू लागली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हा सौम्य हृदयविकाराचा झटका असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र तपासण्यांअंती हा हृदयविकाराचा झटका नसल्याचं समोर आलं. रुग्णालयात भरती झाल्यानंतर धनंजय मुंडे यांची अनेक मंत्री (Ministers) आणि नेत्यांनी भेट घेतली होती. आज शनिवारी 16 एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ

