Karuna Sharma : ‘लग्न झालंच नाही तर…’, करूणा शर्मांच्या पोटगीसंदर्भातील याचिकेवर मुंडेंच्या वकिलांचा युक्तिवाद काय?
'धनंजय मुंडे यांचे करुणा मुंडेंसोबत झालेले लग्न अधिकृत नाही. धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही', करूणा शर्मांनी मुंडेंविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंडेंच्या वकिलांचा युक्तिवाद काय?
राष्ट्रवादी नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज अंतिम सुनावणी पार पडत आहे. करूणा शर्मा यांना पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडे यांच्याकडून माझगाव सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र पोटगीची रक्कम तुटपुंजी असून ती नऊ लाख रुपये करण्यात यावी, अशी करुणा शर्मा यांची मागणी आहे. दरम्यान, आज यासंदर्भात अंतिम युक्तिवाद होत असून धनंजय मुंडे यांच्या बाजूने वकिलाचा कोर्टात युक्तिवाद सुरु आहे. या सुनावणीदरम्यान, जर धनंजय मुंडे यांचं करुणा शर्मा यांच्या सोबत लग्न झालंच नाही तर मग पोटगी कशी देणार? असा सवाल करत झालेलं लग्न हे अधिकृत नाही, असं म्हणत धनंजय मुंडे यांच्या वकिलाने हा युक्तिवाद केला. बघा सुनावणीदरम्यान धनंजय मुंडे यांचे वकील काय म्हणाले?

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट

वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले

धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
