Dharashiv News : जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा
Food Poisoning In Dharashiv : धाराशीवच्या उमरगा तालुक्यात जागरण गोंधळातील जेवणातून तब्बल 79 जणांना विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
जागरण गोंधळातील जेवणातून तब्बल 79 जणांना विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. धाराशीवच्या उमरगा तालुक्यातल्या कराळी गावात ही घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये काही बालकांचा सुद्धा समावेश आहे. दरम्यान, उपचारासाठी 16 जणांना उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.
जेवणातून विषबाधा होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. बहुतांश सार्वजनिक ठिकाणी खाण्यात आलेल्या पदार्थातून विषबाधा होण्याचं प्रमाण वाढलं आहे. धाराशीवमधल्या उमरगा तालुक्यात देखील 79 जणांना जेवणातून विषबाधा झाली आहे. हे सगळे विषबाधा झालेले लोक एक जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात जेवले होते. विषबाधा झालेले काहीजण उपजिल्हा रुग्णालायात उपचार घेत आहेत.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

