राज्यात कृषी विभागाची मोठी कारवाई, राज्यात कुठं 10 कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द?
VIDEO | कृषी विभागाच्या कारवाईत 10 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित, तर 3 केंद्राना ताकीद
धाराशिव : राज्यात कृषी विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील दहा कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले तर 3 केंद्राना ताकीत देण्यात आली आहे. खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी विभागाकडून या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना दुकानदारांना चांगलाच दणका बसल्याचे दिसतेय. कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमधील तपासणीमध्ये जादा दराने खताची विक्री करणे, ई-पॉस मशीन प्रमाणे साठा न जुळणे, परवान्यात समाविष्ट स्त्रोताव्यतिरिक्त इतर निविष्ठाची खरेदी विक्री करणे, साठा रजिस्टरला नोंद नसणे, शेतक-यांना विहीत नमुन्यात पावती न देणे अशी अनियमितता आढळून आली आहे. ही अनियमितता चांगलीच महागात पडली आहे.