Sharad Pawar : 'तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, मी म्हातारा झालो नाही...', शरद पवारांचा महायुतीला इशारा

Sharad Pawar : ‘तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, मी म्हातारा झालो नाही…’, शरद पवारांचा महायुतीला इशारा

| Updated on: Nov 10, 2024 | 5:25 PM

धाराशिवमधील परांडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत शरद पवार यांनी महायुतीला थेट इशारा दिला आहे.

महाविकास आघाडीकडून खासदार शरद पवार हे विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना राज्यभरात दौरे करून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. शरद पवारांनी आज धाराशिवमध्ये जाहीर सभा घेतील यावेळी त्यांनी महायुतीवर निशाणा साधा इतकंच नाहीतर राज्यातील सत्ता बदलणारच असा निर्धारही शरद पवारांनी व्यक्त केला आहे. सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, ओमराजे निंबाळकर मला तुमची गोष्ट आजिबात पटली नाही. या वयातही मी फिरतो असे तुम्ही म्हणालात, मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. शांत बसणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करत निर्धारच व्यक्त केला. पुढे शरद पवार असेही म्हणाले, या लोकांच्या हातात सत्ता देऊन तुमच्या प्रश्नांची सोडवणूक या महाराष्ट्रात होतेय. हे बघितल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. आता एक म्हातारा खांद्यावर बसून आलेला पहिला का? असेही पवार म्हणाले. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, रणजित पाटील उपस्थित होते. परांडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर राहुल मोटे यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत विधानसभा निवडणूक लढवत आहेत. या लढतीकडं संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.

Published on: Nov 10, 2024 05:25 PM