हे भोंदू बाबा आहेत, भोंदू बाबा; अजित पवार वैतागले

हे भोंदू बाबा आहेत, भोंदू बाबा; अजित पवार वैतागले

| Updated on: Apr 03, 2023 | 3:23 PM

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबांना देव मानण्यास नकार देत ते संत होऊ शकतात, ते फकीर होऊ शकतात पण ते देव होऊ शकत नाहीत

मुंबई : राज्यात सध्या दंगलीसदृष्य उटना घडत आहे. त्यातच धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा आणि कालीचरण महाराज हे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यावरून राज्यातील वातावरण तंग बनलेलं आहे. यावकरूनच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी याकडे जास्त लक्ष द्यायचं नसतं असा सल्ला दिला आहे. तर या बाबा लोकांचं जादा ऐकायचं नसतं. जादा ऐकू नका हे भोंदू बाबा आहेत भोंदू बाबा.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबांना देव मानण्यास नकार देत ते संत होऊ शकतात, ते फकीर होऊ शकतात पण ते देव होऊ शकत नाहीत. गिधाडाचं चामडं पांघरून कुणी सिंह होत नाही, असं विधान केलं होतं. तर कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींच्या हत्येचं समर्थन केलं. नथुराम गोडसे यांनी जे केलं ते योग्यच होतं. नथुराम गोडसे नसते तर हिंदू धर्म बुडाला असता, असं विधान कालीचरण महाराजांनी केलं.

Published on: Apr 03, 2023 03:01 PM