‘पहलगाम’वरून महाविकास आघाडीतील मतभेद उघड, शाहांच्या राजीनाम्यावर पवार अन् राऊतांचं वेगळं मत
पहलगामवरून महाविकास आघाडीमध्ये सध्या मतभेद उघड झालेत. संजय राऊतांकडून अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. तर शरद पवारांनी मात्र शहा यांच्या राजीनाम्यावर वेगळं मत मांडलं. आता दहशतवादी शोधणं गरजेचे आहे. कुणाला काढायचं आणि कुणाला ठेवायचं हे बोलणार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. यावेळी दहशतवाद्यांनी नाव विचारून गोळीबार केला, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, पहलगामवरून मविआमध्ये मतभेद सुरू असल्याचे दिसतंय. शरद पवार सरकारबरोबर तर उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या निशाण्यावर सरकार असल्याचे पाहायला मिळतंय. पहलगाम मुद्द्यावर शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेदाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर आता दहशतवाद्यांना शोधणं हे महत्त्वाचं आहे. कुणाला काढा कुणाला ठेवा हे मी बोलणार नाही, असं शरद पवार यांनी स्पष्टपणे म्हटलंय. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत रोज पहलगामवरून सरकारला घेरत असल्याचे दिसतंय. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्ताविरोधात महत्त्वाचे पाच निर्णय घेतल्यानंतर सरकारने एका सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रतिनिधी मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते. सर्वपक्षीय बैठकीमध्ये सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, मात्र ठाकरेंचे नेते वेळेचं कारण देत उपस्थित नसल्याचे दिसून आले.

पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे

यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल

पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर

पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र
