अजित पवार अन् मुख्यमंत्रिपद ही कार्यकर्त्यांच्या मनातील भावना; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा राष्ट्रवादीच्या गोटातून बोलून दाखवण्यात येतीये. त्यावर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा राष्ट्रवादीच्या गोटातून बोलून दाखवण्यात येतीये. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आमदार निलेश लंके यांनी बोलून दाखवली. त्यानंतर आमदार राजू नवघरे यांनीही तसंच वक्तव्य केलं. याविषयी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. “प्रत्येकाला आपापल्या भावना आहेत. प्रत्येकजण आपल्या मनातला भावनेप्रमाणे बोलत असतो. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. शेवटी याचा निर्णय निवडणूक झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होते. पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात त्यावर सगळं अवलंबून असतं”, असं वळसे पाटील म्हणालेत.
Published on: Feb 11, 2023 03:43 PM
Latest Videos