‘शिवसेनेत राहून माझी 15 वर्ष वाया’, ठाकरेंच्या शिवसेनेतून ‘वंचित’मध्ये गेलेल्या शिवसैनिकाची खंत
'मला मागच्या पंधरा वर्षापासून भावी खासदार म्हणून हिणवत होते म्हणून मी शिवसेना सोडून वंचितमध्ये गेलो. मला मागच्या पंधरा वर्षापासून भावी खासदार म्हणून हिणवायचे आणि शेवटच्या दहा दिवसात कोणीतरी दुसराच उमेदवार आणून उभे करायचे...उद्धव ठाकरे यांना मी सांगितलं होतं की, या वेळेस मला लोकसभा लढवायची आहे. पण...'
हिंगोली, १७ फेब्रुवारी २०२४ : मला मागच्या पंधरा वर्षापासून भावी खासदार म्हणून हिणवत होते म्हणून मी शिवसेना सोडून वंचितमध्ये गेलो असल्याची भावना बी.डी चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड आस्था आणि प्रेम असणारा मी कार्यकर्ता आहे. शिवसेनेमधील पदाधिकारी पक्षप्रमुखापर्यंत मला जाऊ देत नव्हते. मागच्या तीन विधानसभेपासून मला उमेदवारी पासून वंचित ठेवले. मला मागच्या पंधरा वर्षापासून भावी खासदार म्हणून हिणवायचे आणि शेवटच्या दहा दिवसात कोणीतरी दुसराच उमेदवार आणून उभे करायचे…पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मी सांगितलं होतं की, या वेळेस मला लोकसभा लढवायची आहे आणि जिंकायची आहे पण त्या दिशेने वाटचाल दिसत नसल्याने मी वंचितमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असे बी.डी चव्हाण यांनी म्हटले. पुढे त्यांनी असेही म्हटले की, 1997 ला जनता दल या पक्षाकडून चक्र या चिन्हावर मी हिंगोली लोकसभा लढवली होती, त्यावेळेस सोबत बाळासाहेबाच होते जनता दल आणि बाळासाहेबांची युती होणार होती पण ऐन वेळेवर जनता दल आणि भारिप बहुजन युती तुटली आणि मला जनता दलाकडून उमेदवारी देण्यात आली. पण 15 वर्षे शिवसेनेमध्ये राहून माझे नुकसान झाले, असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.