‘सुपारी घेऊन मी काम करत नाही’, ‘त्या’ व्हायरल पोस्टनंतर भाजप खासदार काय म्हणाले?
VIDEO | 'त्या' व्हायरल पोस्टबाबत भाजप नेत्यानं काय केला खुलासा?
नाशिक : एकीकडे भाजप आणि शिंदे गट शिवसेना यांची राज्यभरात युती आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीला दहा महिने शिल्लक असताना नाशिकचे भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी थेट नाशिकच्या लोकसभेच्या जागेवर दावा ठोकला आहे. इतकंच नाही तर व्हायरल झालेल्या या पोस्ट बाबत देखील त्यांनी खुलासा केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शिवसेना नेते आणि खासदार हेमंत गोडसे यांचं नाव न घेता त्यांचा गद्दार असा उल्लेख यामध्ये केल्याचे दिसतेय. मात्र हेमंत गोडसे हे गद्दार असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असताना, ही पोस्ट मी शेअर केली नसल्याचं दिनकर पाटील यांनी म्हटले आहे. तर सोशल मीडियावर दिनकर पाटील नावाचा एक फॅन क्लब आहे त्या ग्रुपवरून ती पोस्ट करण्यात आली आहे. त्यामुळे माझा या पोस्टशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. याशिवाय त्यांनी असेही म्हटले की, लोकसभा निवडणुकीमध्ये मी इच्छुक उमेदवार आहे. याकरता मी गेल्या दोन वर्षांपासून नाशिक लोकसभा मतदार संघात काम करतोय असं त्यांनी सांगितलं तरी. आज ही पोस्ट वायरल झाली आहे त्याच्याशी माझा कुठलाही संबंध नसल्याचा त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे कुठली जबाबदारी त्यांच्याकडून घेण्यात आलेली नाही हे त्यांच्या बोलण्यातून समोर आले आहे.