‘योग्य वेळी योग्य निर्णय…’, जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? अन् सभागृहात अजितदादांनी काय लगावला टोला?
राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र या अधिवेशनादरम्यान, अधिक चर्चा रंगली ती शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या वक्तव्याची... अजित पवार यांना उद्देशून जयंत पाटील हे योग्य वेळी योग्य निर्णय असे म्हणाल्याचे पाहायला मिळाले.
महायुती सरकारचं विशेष अधिवेशन नुकतंच संपलंय. राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र या अधिवेशनादरम्यान, अधिक चर्चा रंगली ती शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या वक्तव्याची… अजित पवार यांना उद्देशून जयंत पाटील हे योग्य वेळी योग्य निर्णय असे म्हणाल्याचे पाहायला मिळाले. निमित्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडीचं होतं. राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना अजित पवार यांनी जयंत पाटील यांना मध्येच टोकलं आणि जयंत पाटील यांनी योग्य वेळी योग्य निर्णय असं म्हटल्याने विधिमंडळात भलतीच चर्चा सुरू झाली. पहिल्यांदा आपण निवडून आलो हे सांगत असताना आमदारकीऐवजी अध्यक्ष असा शब्द जयंत पाटील यांनी चुकून उच्चारला. त्यानंतर तात्काळ अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याची दुरूस्ती केली पण पुढे जे काही झालं त्यावरून एकच हशा पिकला. 1990 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर अध्यक्ष नाही, आमदार, असं अजितदादा म्हणाले आणि त्यांनी त्यांची चूक सुधारली. त्यानंतर जयंत पाटील यांनी तात्काळ करत वाक्य दुरुस्त केलं. पहिल्यांदा मी आमदार झालो. यावेळी जयंत पाटील म्हणाले बघा किती लक्ष आहे माझ्यावर, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला. तर जयंत पाटील यांना दादांनीही प्रत्युत्तर दिलं. माझं लक्ष आहे. तुम्ही कधी प्रतिसाद देताय? असा सवाल अजित पवार यांनी केला.