परत यायला अडीच वर्ष, पण २ पक्ष फोडून… देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याची चर्चा
देवेंद्र फडणवीसांचं हे विधान चांगलंच चर्चेत आहे. एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय. त्यावेळी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत फडणवीसांच्या चर्चेत राहिलेल्या मी पुन्हा येईन... या घोषणेवरून त्यांनी पुन्हा विधान केलं.
मुंबई, १८ मार्च २०२४ : आपल्याला पुन्हा यायला अडीच वर्ष लागले, मात्र दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो…असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देवेंद्र फडणवीसांचं हे विधान चांगलंच चर्चेत आहे. एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय. त्यावेळी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत फडणवीसांच्या चर्चेत राहिलेल्या मी पुन्हा येईन… या घोषणेवरून त्यांनी पुन्हा विधान केलं. फक्त सत्ता, खुर्चीसाठी भाजपच्या पाठित खंजीर खुपसलं…त्यावेळी भाजपचा विजय झाल्यावर लोकांनी म्हटलं… मी पुन्हा येईन म्हटलं होतं, हे आले, असं फडणवीसांनी बोलून दाखवलं. २०१९ ला भाजप जिंकून येईल असा विश्वास व्यक्त करत फडणवीसांनी दिलेल्या घोषणेवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र त्यावेळी फडणवीसांनी भुजबळांना दिलेलं उत्तर खरं ठरल्याची चर्चा मात्र पुन्हा सुरू झाली आहे. बघा स्पेशल रिपोर्ट…