Satara : अनोखं सीमोल्लंघन, शासकीय अधिकाऱ्याचं ‘तो’ फलक चर्चेत
VIDEO | शासकीय अधिकारी म्हटले की कागद टेबलावरून हलवण्यासाठी अनेक प्रलोभने दिली जातात. यामुळे जनसामान्यांचा प्रशासनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जातो. मात्र साताऱ्यातील पंचायत समिती येथील गटविकास अधिकाऱ्याचे अनोखे सीमोल्लंघन केल्याचे पाहायला मिळत आहे.
सातारा, २५ ऑक्टोबर २०२३ | शासकीय अधिकारी म्हटले की कागद टेबलावरून हलवण्यासाठी अनेक प्रलोभने दिली जातात. यामुळे जनसामान्यांचा प्रशासनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जातो. मात्र साताऱ्यात काही दिवसापूर्वीच सातारा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून रुजू झालेले लातूर येथील सतीश बुद्धे यांची चांगलीच चर्चा होतेय. कारण त्यांच्या केबिन बाहेर “मी माझ्या पगारावर समाधानी” असा फलक लावला आहे. विशेष म्हणजे दसऱ्याच्या दिवशी हा फलक लावल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी हा फलक लक्षवेधी ठरत आहे. या फलकावर “मी दौऱ्यावर असताना भेटू शकलो नाही तर मला खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर निवेदन तक्रारी लेखी स्वरूपात संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्या अभिप्रायानंतर व्हाट्सअप मेसेज नाव व गावाच्या उल्लेखासह पाठवावा” असा उल्लेख संबंधित फलकावर केला आहे. यामुळे मध्यस्थी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत, असा चुकीचा प्रकार कोणीही आपल्या नावाखाली करू नये यासाठी हा फलक लावला असल्याचे या गटविकास अधिकाऱ्यानं म्हटले आहे.