Disha Salian : कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आले खळबळजनक खुलासे
Disha Salian Postmortem Report : दिशा सालियान हिचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलेला असून 11 जून 2020 रोजी करण्यात आलेल्या या पोस्टमार्टममधून अनेक मोठे खुलासे झालेले आहेत.
दिशा सालियानच्या वडिलांनी आणि वकिलाने आदित्य ठाकरे यांच्यावर काल गंभीर आरोप केले. त्यानंतर आज दिशा सालियान हीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. त्यातून अनेक मोठे खुलासे झालेले आहेत. दिशावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झालेला नसल्याचं पोस्टमार्टम रोपोर्टमध्ये म्हंटलं आहे. याशिवाय दिशाच्या शरीरावर झालेल्या जखमांबद्दल देखील या रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे. दिशाच्या डोक्याला गंभीर इजा झालेली होती. त्याचबरोबर शरीरावर देखील जखमा झालेल्या असल्याने दिशाचा मृत्यू झालेला असल्याचं रिपोर्टमध्ये म्हंटलं आहे. दिशाच्या शरीरात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालेले होते. डोक्यावर आणि शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर इजा झालेल्या होत्या, त्यामुळे दिशाचा मृत्यू झाला. तोंडातून आणि नाकातून रक्तस्त्राव झालेला होता. डोळे, हात, पाय आणि छातीजवळ जखमा झालेल्या होत्या. दिशाचे समोरचे दात देखील पडलेले होते. 11 जून 2020 रोजी दुपारी 4 वाजता हे पोस्टमार्टम करण्यात आलेलं आहे.

'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात

शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत

दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश

पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
