मनसे पदाधिकाऱ्याचेच पक्षावर गंभीर आरोप, नवी मुंबईत राडा अन् मनसेचे दोन गट आमने-सामने
मनसेच्या पदाधिकाऱ्यानेच राज ठाकरे यांच्या मनसे पक्षावर गंभीर आरोप केलेत. या आरोपांमुळे मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली असून आक्रमक वातावरण आहे. राज ठाकरेंचा पक्ष खंडणीखोर आहे. महेश जाधव यांच्या या आरोपांनंतर नवी मुंबईत मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. नवी मुंबईत महेश जाधव समर्थक आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.
मुंबई, ९ जानेवारी २०२४ : मनसेच्या पदाधिकाऱ्यानेच राज ठाकरे यांच्या मनसे पक्षावर गंभीर आरोप केलेत. या आरोपांमुळे मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली असून आक्रमक वातावरण आहे. राज ठाकरेंचा पक्ष खंडणीखोर आहे. तर माथाडी कामगार प्रकरणात अमित ठाकरे यांनी मारहाण केल्याचेही त्याच पदाधिकाऱ्याने म्हटले आहे. कामगारांची बाजू सोडत नाही म्हणून मनसे नेते अमित ठाकरे यांनीच आपल्याला राजगड येथे बोलवून बेदम मारहाण केल्याचा दावा मनसेच्या मराठी कामगार सेनेचा अध्यक्ष महेश जाधव यांनी केलाय. दरम्यान, महेश जाधव यांच्या या आरोपांनंतर नवी मुंबईत मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. नवी मुंबईत महेश जाधव समर्थक आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. माथाडी कामगार महेश जाधव यांच्या समर्थनार्थ मेरी कव्हर रुग्णालयाजवळ जमा झाले. यावेळी महेश जाधवांचे समर्थक आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, मनसेकडून याबाबत अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन पत्रक जारी करण्यात आलं आहे. या पत्रकात मराठी कामगार सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.