‘आप’चा झाडू हरवण्यात काँग्रेसचाही ‘हात’? दिल्लीतून हद्दपार आप अन् इंडिया आघाडीत ‘ताप’?
दिल्लीतून आप हद्दपार झाल्यानंतर इंडिया आघाडीतलं वातावरण मात्र तापदायक बनण्याची चिन्हे आहेत. सोबत राहायचं की एकमेकांविरोधात लढायचं हे आता ठरवण्याची वेळ आली, असं एक मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. दिल्लीत आपच्या पराभवामागे काँग्रेसचाही हात असल्याची टीका होऊ लागली.
दिल्लीच्या सत्तेतून आम आदमी पक्ष हद्दपार होताच इंडिया आघाडी ताप सुरु झाला. भाजप विजयी झाली असली तरी काँग्रेसच्या गोटात केजरीवालांच्या पराभवाने आनंद झाल्याच्या चर्चा रंगताय. त्यावरून इंडिया आघाडीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसला दिल्ली विधानसभेत एकही जागा मिळवता आली नाही पण काँग्रेस स्वतंत्र लढल्यामुळे आपच्या 14 जागा पडल्या. त्यात 14 जागांवर भाजप विजयी ठरली. जर दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर भाजप 48 विरुद्ध आप 22 या निकाला ऐवजी आप पुन्हा दिल्लीच्या सत्तेच्या जवळ पोहोचत होती. संगम विहार परिसरामध्ये भाजपनं आपचा 344 मतांनी पराभूत केला इथं काँग्रेसने 15,863 मतं घेतली. त्रिलोकपुरीमध्ये भाजपनं आपवर 392 मतांनी विजय मिळवला. काँग्रेसला इथं 6147 मत मिळाली जंगपुरामध्ये भाजप विरोधात मनीष सिसोदिया 675 मतांनी पडले. इथं काँग्रेसला 7350 मत मिळाली. तिमारपुरामध्ये भाजपनं 1168 मतांनी आपला हरवलं. काँग्रेसला इथं 8361 मतं मिळाली. राजेंद्र नगर मध्ये भाजपनं 1231 मतांनी विजय मिळवला. काँग्रेसने इथे देखील 4015 मत मिळवली. नवी दिल्लीमध्ये भाजपनं केजरीवालांना 4089 मतांनी हरवलं, काँग्रेसच्या दीक्षितांनी इथे 4568 मतं घेतली. अशा जवळपास 12 जागांवर आपच्या पराभवाच्या अंतराचं गणित काँग्रेसला गेलेल्या मतामुळे बिघडलं. दिल्लीमध्ये केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला का आनंद होतोय त्याआधी भाजपासाठी हा विजय किती महत्त्वाचा होता. बघा स्पेशल रिपोर्ट…