धरणं आटली, पाणी पुरवठ्यावर परिणाम; टँकर दिसताच नागरिकांची उडतेय कुठं झुंबड
पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. तर कुठे प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. असेच चित्र सध्या पाण्यानं समृद्ध समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरात पहायला मिळत आहे. येथे कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारे करणारे सर्वच धरणातील पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे.
कोल्हापूर : राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. तर कुठे प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. असेच चित्र सध्या पाण्यानं समृद्ध समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरात पहायला मिळत आहे. येथे कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारे करणारे सर्वच धरणातील पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यात आता बदल करण्यात आला आहे. तर नदी पात्रातूनच दिवसा आड उपसा होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराला आता पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
पंचगंगा आणि भोगावती नदीमध्ये पाटबंधारे विभागाने दिवसा बंदी लागू केल्याने उद्यापासून कोल्हापूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. शिवाय शहरातील अनेक उपनगरात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. 51 टँकरच्या सहाय्याने सध्या कोल्हापूर उपनगरात पाणीपुरवठा सुरू आहे. तर चार ते पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या टँकरचं पाणी भरण्यासाठी नागरिकांची देखील झुंबड उडताना येथे दिसत आहे.