‘शरद पवार यांनी भाकरी फिरवली नाही तर…’, ‘समाना’तून नेमका काय साधला निशाणा?
VIDEO | शरद पवार यांना राष्ट्रवादीचे दोन कार्याध्यक्ष नेमण्याची गरज काय? सामनातून थेट सवाल
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. राष्ट्रवादी पक्षाच्या २५ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिल्लीत शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. तर सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाबचीही जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, यावर सामनातून भाष्य करण्यात आले असून थेट शरद पवार यांना विचारणा करण्यात आली आहे. भविष्यातील राजकारणाचा विचार करून शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही प्यादी हलवली आहेत. नव्या रचनेत कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आली आहे. दुसरे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, राजस्थान वगैरे प्रदेश पाहतील. शरद पवारांनी भाकरी फिरवली नसून आता कोठे चुलीवर टाकली आहे. भाकरी कच्ची राहू नये म्हणून ती फिरवावीच लागते. आधीची भाकरी करपल्याने नवी भाकरी थापली असेल तर वाट पाहावी लागेल. राष्ट्रवादी कॉंगेसच्या वर्धापनदिनी शरद पवार यांनी पक्षात काही बदल केले. त्यात धक्कादायक वगैरे काहीच दिसत नाही.. शरद पवारांनी राष्ट्रीय पातळीवर दोन प्रमुख नियुक्त्या केल्या. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली. यास काही जण शरद पवारांनी ‘भाकरी फिरवली’ असे म्हणत असतील तर त्यात दम नाही. तर एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का पडली? असा सवालही उपस्थित केला आहे.