Dombivli Crime : डोंबिवलीत किरकोळ कारणावरून युवकाला मारहाण, सीसीटीव्ही बघाल तर थक्क व्हाल

Dombivli Crime : डोंबिवलीत किरकोळ कारणावरून युवकाला मारहाण, सीसीटीव्ही बघाल तर थक्क व्हाल

| Updated on: Apr 25, 2022 | 5:41 PM

काही जणांसोबत त्याचे आणि त्याच्या मित्राचे किरकोळ कारणावरून वाद झाले. त्यामुळे 7 ते 8 जणांनी त्याला मारहाण केली. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत सुद्धा कैद झाली आहे.

डोंबिवली : आजकाल किरोकळ कारणाचा वाद कुठपर्यंत जाईल सांगता येत नाही. कारण किरकोळ कारणावरून आता टोकाची हिंसा (Crime) पेटताना दिसून येत आहे. असेच एक उदाहरण डोंबिवलीत (Dombivli) घडले आहे. डोंबिवलीत किरकोळ कारणावरून एका युवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीये. ही घटना सीसीटीव्हीत (CCTV Footage) कैद झाली असून मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येतेय. गेल्या काही दिवसांत अशा घटना या परिसरात वाढल्या आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही बारकाईने पाहिले तर सुरूवातील काहीतरी वाद झाल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर आजुबाजुचा जमाब या एका तरुणावर तुटून पडताना दिसूनत आहे. मारत, ढकलत या तरुणाला बाजुला असलेल्या रिक्षाला धडकवले आहे. त्यानंतर त्याला खाली पाडून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.

 

Published on: Apr 25, 2022 05:41 PM